Wednesday, August 14, 2019

Sant Tukaram - Shivaji Maharaj : भक्ती -शक्ती

Shivaji Maharaj was one of the greatest king in India. He was himself a genuinely spiritual person, can be seen from his dialogues like "..ही श्रींची इच्छा.." and also from the fact that he considered Sant Ramdas, a contemporary saint, his Guru.

He had heard about Sant Tukaram and was very eager to meet him. So he sent some gifts and invitation for meeting.

Below are some lines from the Abhangs Sant Tukaram wrote after finding this out.

Dislike for Material Things

दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यात न पडे ।।
आता येथे पंढरिराया । मज गोविसी कासया ।।
मान दंभ चेष्टा । हे तो शुकराची विष्ठा ।।
तुका म्हणे देवा । माझे सोडववणे धावा ।।

From the above abhang, it is clear that among the gifts sent, torch bearer, special umbrella and horses were also present. Tukaram Maharaj, directs this abhang to Pandurang, his Lord. He asks, why my dear God, you want me to be bound to these things. He says, for me, others' respect, hypocrisy and other such games are like excreta of pig, they do not matter to me at all. Oh God, please save me from this situation.

नावडे जे चित्ता । ते चि होसी पुरविता ।।

In another abhang, he gets angry with the God and tells him, you only give me those things, which I do not need!
He makes it pretty clear that, he does not care for respect given by anyone, not even kings.

तुम्हापाशी आम्ही येऊनिया काय । वृथा सीण आहे चालण्याचा ।।

In another abhang, he tells Shivaji Maharaj, what will be achieved by my coming to meet you? Nothing. Only the result will be the wasted effort of walking.

आता हे चि तुम्हा सांगणे कौतुक । भिक्षे ऐसे सुख नाही नाही ।।

In another abhang, he tells Shivaji Maharaj that he does not need anything. He further goes on to say that he lives on alms only. And in the above line, he says, I would like to share a wonderful thing with you, that there is no such pleasure, as that received from alms.

Upadesh to Shivaji Maharaj (Teachings)

He wrote multiple abhangs with guidelines for Shivaji Maharaj. Below are some lines from them:

विश्व हे विठ्ठल नाही दुजे काही । देखणे तुझे ही तयामाजी ।।

This whole universe is God (Vitthal) Himself, and I see you too, in Him.

सद्गुरू श्रीरामदासाचे भूषण । तेथे घाली मन चळों नको ।।
बहुतां ठायीं वृत्ति चाळवली जेव्हा । रामदास्य तेव्हा कैसे घडे ।।

He tells Shivaji Maharaj, you have accepted Sant Ramdas as your Guru, so please follow his teaching attentively, do not let your mind wander anywhere else.

He further says, if you let your mind loose and try to learn from too many sources, you will not be able to serve God (Ram). So please be focused.

Then below is a full abhang, with direct guidelines for Shivaji Maharaj,

आता एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानू नये ।।
जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये ।।
निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका ।।
परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया ।।
सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।।
हे चि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शने चाड नाही ।।
घेऊनिया भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ।।
एकदोनी कर्मे जाणोनिया वर्में । आपुलिया भ्रमे राहू आता ।।
कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूती देख एक आत्मा ।।
आत्मारामी मन ठेऊनिया राही । रामदासी पाहे आपनेया ।।

"The Yoga that you have to fulfill is as follows, do not get wearied by your good deeds i.e. be enthusiastic to always do what is good.
Do not do anything which will result in a blemish on yourself.
As a king, there are all kinds of people around you, including, defamers and evil people. Please know who they are and do not follow any of their suggestions.
You also need to understand, who are the people interested in welfare of the state, you need to intelligently identify them.
I should not be explicitly telling you as you are very learned and a good king, but please be a benefactor of the poor and desolate people.

I will be happy to learn of these things being followed by you, there is now no other reason to meet. Even if we meet, what is to be achieved, we have already lost so much time till now (let us now focus on our aims/tasks, instead of wasting time in this meeting).

Another important thing is, when you are trying to determine if a policy is good or bad, keep in mind that in all the living beings, only One God/Atma is present.
Please keep your mind in the knowledge of the Soul - Sant Ramdas will surely take care of you."

There are sure a thing or two, to learn from these abhangs, for us as well!

Friday, September 22, 2017

आपुल्या विचार करीन जीवा‌शी - संत तुकाराम


आपुल्या विचार करीन जीवा‌शी । काय या जनाशी चा‌ड मज ॥
आपुले स्वहित जाण‌ती सकळे । निरोधिता बळे दु:ख वाटे ॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनिया घरी निजो सुखे ॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनिया वाट आणिका लावू ॥
तुका म्हणे भाकू आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥


साधक अवस्थेत असताना आपण स्वहिताचा विचार करावा असं संत तुकाराम येथे सांगतात. बाकी लोक अापल्या सांगण्याने बदलत नसतील, तर त्याचे दु:ख मानू नये, स्वत:ला त्रास करून घेऊ नये. अापण अापल्या परीने प्रयत्न करून बाकीच्यांना भक्तीचा पंथ दाखवण्याचा प्रयत्न करावा अाणि त्यांनी ऐकले तरी ठीक नाही ऐकले तरी ठीक या नियमाने वागावे.

तुकाराम महाराज म्हणतात,
मी आता स्वत:च्या जीवाचा विचार करीन, जनांचा जास्त विचार करणार नाही.
सगळे लोक आपले स्वहित जाणून आहेत, त्यांना जर आपण काही सांगितले किंवा काही वाईट सवयी सुधारण्यासाठी सांगितले (निरोध करण्याचा प्रयत्न केला), तर त्याचे लोकांना दु:ख होते.
त्यामुळे मी माझ्या परीने भगवंताची कथा-कीर्तन करीन, ते कोणी ऐको वा न ऐको, मी वाईट वाटून घेणार नाही. घरी जाऊन सुखाने, निश्चिंतीने झोपी जाईल (त्यासाठी स्वत:ची झोप उडवून घेणार नाही).
मला कुठे एवढे पडले आहे की ही भक्तीची जी वाट मला सापडली आहे, बाकी जनांना ही त्या वाटेला लावू.
आता पांडुरंगाला माझीच करुणा भाकावी, बाकी ज्याची जशी भावना/विचार आहे, त्याप्रमाणे पांडुरंग त्यांना फळ देईलच!

In short, do not worry about results of your preaching to others. Instead, be focused on improving yourself, all the rest will be taken care by Lord himself.

Saturday, April 22, 2017

शेवटचा दिस गोड व्हावा - संत तुकाराम

याजसाटी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
आता निश्चिंतीने पावलो विसावा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||
कवतुक वाटे जालिया वेचाचे | नाव मंगळाचे तेणे गुणे ||
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आता दिवस चारी खेळीमेळी ||

संत ज्ञानेश्वर महाराज जो 'सोनियाचा दिनु' म्हणतात तो तुकारामांच्या जीवनात आला त्या वेळचा हा अभंग. त्यांनी सगळे कष्ट, त्याग, अभ्यास ज्या साठी केले ते त्यांना प्राप्त झाले असा हा मंगल क्षण. अत्यंत कठोर मेहनत घेतल्यानंतर जेव्हा कष्टाचे चीज होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मौल्यवान असते. तुकाराम महाराजांनी भागवत्प्राप्ती साठी सगळे कष्ट घेतले होते, ते फलद्रुप झाल्याचा हा क्षण. 

ते म्हणतात त्यांनी जो सर्व अट्टाहास केला तो यासाठी होता कि आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्याच्या अंती समाधान असावे. अपूर्ण इच्छा, मृत्यूचे भय इ. काही नसावे. ते म्हणतात कि आता मला विसावा मिळाला आहे. आता मी निश्चिन्त आहे कारण आता कुठलीही तृष्णा त्यांच्या मनात शेष नाही, समाधान आहे. मनात कुठलीही तृष्णा नसणे, समाधान आणि आनंद असणे हेच भगवत्प्राप्तीचे लक्षण आहे. 
ते पुढे म्हणतात कि आतापर्यंत जे कष्ट घेतले त्याचे आता कौतुक वाटते आहे. म्हणजेच मेहनत घेताना जो त्रास सहन केला तो आता त्रास न वाटता गोडच वाटतो आहे. कारण त्या कष्टांमुळेच आजचा मंगल दिवस पाहायला मिळाला आहे. ते पुढे म्हणतात कि आता मुक्ती हिच आता त्यांची नवरी होणार आहे, म्हणजेच हे जग सोडल्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्त होणार आहे. आणि तो पर्यंत खेळी मेळित उरलेले आयुष्य काढायचे आहे. 

या आणि यासारख्या तुकारामांच्या अभंगातून आपल्यासारख्या साधारण जनांना प्रेरणा मिळते. आपण जर जीवापाड मेहनत घेतली तर भागवत्प्राप्ती ही दूर नाही हेच कळते. आपणही सगळ्यांनी अट्टाहास करावा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा हीच प्रार्थना!

Friday, January 13, 2017

मनाचे श्लोक - ७६

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही।
नव्हे भोग ना त्याग ना सा़ंग पाही॥
म्हणे दास, विश्वास, नामी धरावा।

प्रभाते मनी राम चि‌ंतीत जावा॥

मनाचे श्लोक म्हणजे मराठी भाषेतली एक खूप मोलाची रचना आहे. संत रामदासांनी मनाला शिकवण देण्यासाठी मनाचे श्लोक लिहीले आहेत. मनाला गोडी गुलाबीने (मना सज्जना.., मना प्रार्थना तुला.., .) सुधारण्याचा आणि दुर्गुणांचा त्याग करून सद्गुण अंगी बाणण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे.

वरील श्लोकात, संत रामदास अत्यंत साध्या-सरळ भाषेत भगवंताच्या नामाचे महत्व सांगत आहेत. ते म्हणतात, मना तुला कर्म, धर्म, योग यांची चिंता करण्याची गरज नाही. भोग-त्याग, सांग (विधी-निषेध) यांचा ही विचार करू नकोस. फक्त भगवंताच्या नामावर विश्वास ठेवून नित्य नामस्मरण करत जा. रोज सकाळी रामाचे चिंतन करत जा. हे केल्यावर तुला भगवत्प्राप्तीसाठी बाकी कुठल्याच साधनाची गरज नाही!

Saturday, September 10, 2016

स्वधर्मयज्ञ - ज्ञानेश्वरी


ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा, ओवी 127-130

जे देहचि आपणपें मानिती| आणि विषयांतें भोग्य म्हणती| यापरतें न स्मरती| आणिक कांहीं ||
हें यज्ञोपकरण सकळ| नेणतसां ते बरळ| अहंबुद्धि केवळ| भोगूं पाहती ||
इंद्रियरुचीसारिखें| करविती पाक निके| ते पापिये पातकें| सेविती जाण ||
संपत्तिजात आघवें| हें हवनद्रव्य मानावें| मग स्वधर्मयज्ञें अर्पावें| आदिपुरुषीं ||
 
अर्थ:

जे 'मी' म्हणजे देह व विषय म्हणजे भोग्य वस्तु असे मानतात आणि या शिवाय ज्यांना दुसरे काही सुचत नाही,
असे मुर्ख लोक यज्ञाचे साधन असलेल्या वस्तुंचा (धन, संपत्ती, अन्न इ.) अहंकार बुद्धीने स्वार्थासाठी उपभोग घेतात (इथे ज्ञानेश्वरांना यज्ञ म्हणजे स्वधर्म किंवा स्वकर्तव्य अभिप्रेत आहे).
स्वत:च्या रुचीप्रमाणे जे स्वयंपाक(अन्न) बनवुन सेवन करतात ते तत्वत: पापाचेच सेवन करतात.
सर्व स्वसंपत्ती ही यज्ञातिल आहुती मानुन देवाला अर्पण करावी.

Translation:

Thoes who consider themselves only as body and nothing more and consider sense objects as the means of sense gratification, such idiots utilise all the resources(money, property, food, etc..), which should ideally be used for sacrifice (which implies duty and selfless service), for fulfilling their selfish desires. When they cook food as per their taste and eat, they do not understand that they eat sins. All one's resources (including money, property etc.) should be understood as sacrificial elements to be sacrificed in the sacrifice (Yadnya) of duty (and selfless-service) for the pleasure of the God.


Here, Sant Dnyaneshwar is explaining the importance of स्वधर्म, which means one's duty and self sacrifice. He calls स्वधर्म as a Sacrifice to be performed by everyone. He says that all one's resources should be used for this sacrifice. Instead if one uses these resources for self gratification then it is a great sin.

Sunday, June 12, 2016

सुख पाहता जवापाडे - संत तुकाराम

सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥
धरी धरी आठवण । मानी संताचे वचन ॥
नेले रात्रीने ते अर्धे । बाळपण जराव्याधे ॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥

माणसाला आयुष्यात मिळणारे सुख हे जवसाच्या बी समान छोटे असते आणि दुःख मात्र पर्वताएवढे असते. त्यामुळे, तुकाराम महाराज म्हणतात, संतांची वचने मानून त्याप्रमाणे आचरण करा, देवाची नित्य आठवण ठेवा.
माणसाचे अर्धे आयुष्य झोपेत जाते. उरलेल्या आयुष्यापैकी बालपण, वृद्धापकाळ आणि आजारपण हे बरेच आयुष्य खातात (त्यात माणुस काहीही साधना इ. करु शकत नाही). जे थोडे फार आयुष्य उरते, ते ही माणुस मूर्खासारखा घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे संसाराचे ओझे वाहण्यात वाया घालवतो.

In life, we get happiness of the size of a flaxseed (very small) and unhappiness of the scale of the mountains.
(Hence, Sant Tukaram says,) please accept the teachings of the saints and remember the God.
He says, night or sleep takes half of the human life. More than half of the rest of the life is taken by the childhood, old age and diseases.
Tuka says, for whatever short part of useful life is left, you're wasting it like an idiot, working like a farm animal who simply carries heavy loads all his life for nothing.

Sunday, September 6, 2015

बोले तैसा चाले - संत तुकाराम

बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥
अंगे झाडीन अंगण । त्याचे दासत्व करीन ॥
त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥

"जो 'जसा बोलतो त्याप्रमाणेच वागतो' त्याच्या पाउलांचे मी वंदन करतो.
त्याच्या घराचे अंगण मी स्वतःच्या अंगाने झाडीन, त्याचा दास बनून राहीन.
त्याचा दास होऊन त्याच्या सेवेसाठी नेहमी त्याच्यासमोर हात जोडून उभा राहीन.
माझ्यासाठी तोच देव आहे आणि त्याच्या चरणीच माझा प्रेम भाव आहे."

This is among the most famous abhang of the Sant Tukaram. The line "बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥" meaning "I bow down to the one who walks his talk", is very well known and highly referenced in Marathi literature and in general life in Maharashtra.

He further says
"I'll clean the space in front of his house with my own body, I'll become a slave to him. 
As his slave I'll stand in front of him with folded hands (waiting for orders; to serve him)"
Sant Tukaram is ready to become his slave, to serve him. He knows how rare it is to find such a person and how great and worshippable he is.

He further says, "He is God to me and I'll worship his lotus feet".
He is conveying the importance of this quality very earnestly here. He says such a person is like God himself. So, Walk the Talk!