Saturday, September 10, 2016

स्वधर्मयज्ञ - ज्ञानेश्वरी


ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा, ओवी 127-130

जे देहचि आपणपें मानिती| आणि विषयांतें भोग्य म्हणती| यापरतें न स्मरती| आणिक कांहीं ||
हें यज्ञोपकरण सकळ| नेणतसां ते बरळ| अहंबुद्धि केवळ| भोगूं पाहती ||
इंद्रियरुचीसारिखें| करविती पाक निके| ते पापिये पातकें| सेविती जाण ||
संपत्तिजात आघवें| हें हवनद्रव्य मानावें| मग स्वधर्मयज्ञें अर्पावें| आदिपुरुषीं ||
 
अर्थ:

जे 'मी' म्हणजे देह व विषय म्हणजे भोग्य वस्तु असे मानतात आणि या शिवाय ज्यांना दुसरे काही सुचत नाही,
असे मुर्ख लोक यज्ञाचे साधन असलेल्या वस्तुंचा (धन, संपत्ती, अन्न इ.) अहंकार बुद्धीने स्वार्थासाठी उपभोग घेतात (इथे ज्ञानेश्वरांना यज्ञ म्हणजे स्वधर्म किंवा स्वकर्तव्य अभिप्रेत आहे).
स्वत:च्या रुचीप्रमाणे जे स्वयंपाक(अन्न) बनवुन सेवन करतात ते तत्वत: पापाचेच सेवन करतात.
सर्व स्वसंपत्ती ही यज्ञातिल आहुती मानुन देवाला अर्पण करावी.

Translation:

Thoes who consider themselves only as body and nothing more and consider sense objects as the means of sense gratification, such idiots utilise all the resources(money, property, food, etc..), which should ideally be used for sacrifice (which implies duty and selfless service), for fulfilling their selfish desires. When they cook food as per their taste and eat, they do not understand that they eat sins. All one's resources (including money, property etc.) should be understood as sacrificial elements to be sacrificed in the sacrifice (Yadnya) of duty (and selfless-service) for the pleasure of the God.


Here, Sant Dnyaneshwar is explaining the importance of स्वधर्म, which means one's duty and self sacrifice. He calls स्वधर्म as a Sacrifice to be performed by everyone. He says that all one's resources should be used for this sacrifice. Instead if one uses these resources for self gratification then it is a great sin.

Sunday, June 12, 2016

सुख पाहता जवापाडे - संत तुकाराम

सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥
धरी धरी आठवण । मानी संताचे वचन ॥
नेले रात्रीने ते अर्धे । बाळपण जराव्याधे ॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥

माणसाला आयुष्यात मिळणारे सुख हे जवसाच्या बी समान छोटे असते आणि दुःख मात्र पर्वताएवढे असते. त्यामुळे, तुकाराम महाराज म्हणतात, संतांची वचने मानून त्याप्रमाणे आचरण करा, देवाची नित्य आठवण ठेवा.
माणसाचे अर्धे आयुष्य झोपेत जाते. उरलेल्या आयुष्यापैकी बालपण, वृद्धापकाळ आणि आजारपण हे बरेच आयुष्य खातात (त्यात माणुस काहीही साधना इ. करु शकत नाही). जे थोडे फार आयुष्य उरते, ते ही माणुस मूर्खासारखा घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे संसाराचे ओझे वाहण्यात वाया घालवतो.

In life, we get happiness of the size of a flaxseed (very small) and unhappiness of the scale of the mountains.
(Hence, Sant Tukaram says,) please accept the teachings of the saints and remember the God.
He says, night or sleep takes half of the human life. More than half of the rest of the life is taken by the childhood, old age and diseases.
Tuka says, for whatever short part of useful life is left, you're wasting it like an idiot, working like a farm animal who simply carries heavy loads all his life for nothing.