Saturday, October 2, 2010

बरे झाले देवा - Sant Tukaram

बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥
बरे झाले देवा बाईल कर्कशा । बरी ही दुर्दशा जनामध्ये ॥
बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥
बरे झाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥
बरे झाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली ॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥

Lord, its very good that I got bankrupt, it is good that this draught brought about lot of pain. During all this pain, I was always thinking about you, thus whole material world became like a vomit to me (it became as callous to me as vomit).
Lord, it is good that my wife is always shouting at me, it is good that I face predicament in the society.
It is good that I was insulted by the society, its nice that I lost all my money and domestic animals.
I did this good thing by not thinking about what people will say and I surrendered to you.
Its good that I worshipped you and did not pay much attention to my wife and children.
Tuka says, I did well to do Ekadashi fast and Jagaran (staying up all night, singing/listening about Lord).

4 comments:

Unknown said...

जीवनचे वास्तविक चित्र महाराजांनी आपल्या अभंगात रेखाटले आहे. आणि हे चित्र केवळ महाभागवत वैष्णवच रेखाटू शकतात ऐ-या गै-याचे ते काम नाही .
.... श्रीतुकाराम महाराजांना कोटी कोटी प्रणाम !

शरद पाटणकर said...

कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद

PM said...

Pranam

Laxmikant said...

Really only true devotee can say this. जसे कुंती महाराणी पण प्रार्थना करते, की मला सदा दुख देत रहा, जेणेकरून मी तुम्हाला आठवण करेन, त्याच प्रमाणे तुकाराम महाराज इथे भगवंतांना धन्यवाद देत आहेत. खरे म्हणजे तुकाराम महाराज अपलयला च शिकवतात की, कसे भगवंताचे उपकार मानावे. नाहीतर थोडा काही वाईट झालं की लोकं लगेच देवाला शिव्याव द्यायला लागतात, आणि भरपूर काही चांगले होत असताना कधीच आपण भगवंतांना आठवण करत नाही. म्हणून कुंतींमहरणी, तुकाराम महाराज असं प्रार्थना करतात, अभंग लिहतात, जेणेकरून, आपली श्रद्धा टिकली पाहिजे. धन्य आपले वैदिक शिकवण, धनी ते सगळे संत आचार्य आणि धनी आपणही, आपल्याला असे संत लाभले आपल्या देशास, राष्ट्रांत, राज्यास, ....