Friday, January 13, 2017

मनाचे श्लोक - ७६

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही।
नव्हे भोग ना त्याग ना सा़ंग पाही॥
म्हणे दास, विश्वास, नामी धरावा।

प्रभाते मनी राम चि‌ंतीत जावा॥

मनाचे श्लोक म्हणजे मराठी भाषेतली एक खूप मोलाची रचना आहे. संत रामदासांनी मनाला शिकवण देण्यासाठी मनाचे श्लोक लिहीले आहेत. मनाला गोडी गुलाबीने (मना सज्जना.., मना प्रार्थना तुला.., .) सुधारण्याचा आणि दुर्गुणांचा त्याग करून सद्गुण अंगी बाणण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे.

वरील श्लोकात, संत रामदास अत्यंत साध्या-सरळ भाषेत भगवंताच्या नामाचे महत्व सांगत आहेत. ते म्हणतात, मना तुला कर्म, धर्म, योग यांची चिंता करण्याची गरज नाही. भोग-त्याग, सांग (विधी-निषेध) यांचा ही विचार करू नकोस. फक्त भगवंताच्या नामावर विश्वास ठेवून नित्य नामस्मरण करत जा. रोज सकाळी रामाचे चिंतन करत जा. हे केल्यावर तुला भगवत्प्राप्तीसाठी बाकी कुठल्याच साधनाची गरज नाही!

No comments: