Wednesday, March 24, 2010

तुका म्हणे

आळस पाडी विषयकामी । शक्ती देई तुझ्या नामी ॥
हे चि विनवणी विनवणी । विनविली धरा मनी ॥
आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जो द्यावी गुणी ॥
तुका म्हणे पाय डोळा । पाहे एरवी आंधळा ॥

Let me be lazy with the sense pleasures and empower me with your name.
I request you again and again, please accept.
Let me sing loudly when I'm singing you (your qualities), let me be mute otherwise.
Let me have eyes (vision) when I'm seeing you, let me be blind otherwise.

Sant Tukaram

स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥
नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरे ना ॥
दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें । लावण्य ते खरे दुःखमूळ ॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बांधू संघट्टणें ॥


पराविया नारी रखुमाईसमान । हे गेले नेमून ठायींचे चि ॥
जाई वो तूं माते न करी सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ॥
न सहावे मज तुझे हे पतन । नको हे वचन दुष्ट वदों ॥
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥