स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥
नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरे ना ॥
दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें । लावण्य ते खरे दुःखमूळ ॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बांधू संघट्टणें ॥
पराविया नारी रखुमाईसमान । हे गेले नेमून ठायींचे चि ॥
जाई वो तूं माते न करी सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ॥
न सहावे मज तुझे हे पतन । नको हे वचन दुष्ट वदों ॥
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥
No comments:
Post a Comment